मुंबईत कारखान्यात स्फोट, ५ ठार

मुंबई दि. २९ – मुंबईच्या साकीना भागातील एका रासायनिक कारखान्यात पहाटे दोन च्या सुमारास झालेल्या स्फोटात शेजारील घर कोसळून पाच व्यक्ती ठार झाल्या. अन्य तीन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे समजते. स्फोटाचे कारण समजू शकलेले नाही.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे अचानक मोठा आवाज आला आणि मदतीसाठी हाका ऐकू आल्या. त्या ठिकाणी घर कोसळून आत माणसे अडकली असल्याचे दिसले. काही वेळात आगीचे चार बंब आणि तीन रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या. शेजारील रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली होती. कारखान्याची सीमा भिंत या घराला लागून होती त्यामुळे घर कोसळले. त्यात ५ जण ठार झाले होते. तीन जखमींना रुग्णालयात हलविले गेले.

घटनास्थळी पोलीस हजार झाले असून पुढील तपास सुरु आहे.