आता आपली शिक्षा काही चुकत नाही हे पुरतेपणाने कळून चुकलेल्या संजय दत्तने माफीसाठी प्रयत्न न करण्याचे आणि आयुष्यातली साडे तीन वर्षे जेलमध्ये जाण्याचे ठरवले आहे. अर्थात त्याला काही इलाज नाही. पण त्याने हे पत्रकार परिषदेत का जाहीर केले हे समजत नाही. जगातला कोणताही गुन्हेगार शिक्षा झाल्यावर पत्रकार परिषदेत जाऊन ती शिक्षा भोगणार आहोत असे जाहीर करीत नसतो पण आपल्या देशात काहीही चालते. तो असे चाळे करतो तरीही आपण त्याचे कौतुकच करतो. तो या पत्रकार परिषदेत रडला. खरे तर त्यातही काही नवल नाही. कोणताही आरोपी शिक्षा झाली की रडतच असतो. पण त्याने कितीतरी लोकांना कायम दु:खात लोटलेले असते. एवढे असूनही त्याचे कौतुकच होत आहे. आपण भावना आणि कायदा यांचा नेहमीच घोेळ घालत असतो.
शिक्षा कोणाला, उसासे कोणाचे ?
कचकड्याच्या जगात नाचणारे आणि दिग्दशर्र्क सांगेल तसे हलणारे बोलणारे ते नकली हीरोे आपल्याला स्वर्गातले देव वाटत असतात. खरे तर आपल्या देशात शूर योद्ध्यांची मोठी परंपरा आहे. आपण त्यांची उपेक्षा करतो आणि त्यांचे कपडे घालून त्यांचा अभिनय करणारांना आपण डोक्यावर घेतो. संजय दत्त हे त्याचे एक ज्वलंत उदाहरण. खरे तर तो अतिरेकी. पैशाच्या मस्तीत त्याने कायद्याची पायमल्ली करून अनेकांचे प्राण घेणारी बंदूक खरेदी केली. ती खरेदी करताना त्याला तिची निवड करता यावी म्हणून त्यांची आयात करणार्या बदमाषांनी सारा शस्त्रसाठा त्याच्या समोर ठेवला होता. त्यातली एक बंदूक त्याने खरेदी केली. पण ज्यांनी आपल्या समोर हा एवढा बंदुकांचा साठा खुला केला आहे त्यांनी तो कशासाठी आणला आहे आणि त्यापासून सामान्य माणसाला धोका होणार आहे का असा प्रश्न त्याला पडला नाही. आणि या बंदुका आयात करण्यात येत असल्याची खबर आपण पोलिसांना द्यावी असे त्याला वाटले नाही.
आता त्याला पाच वर्षाची शिक्षा झाल्यामुळे ज्यांना त्याच्याविषयी उमाळे येत आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार केलेला नाही. त्याची चित्रपटातली भूमिका पाहून हे मूर्ख लोक त्याला प्रशस्तीपत्र द्यायला लागले आहेत आणि त्याची शिक्षा माफ व्हावी अशी अपेक्षा करायला लागले आहेत. खरे तर यावर कोणी चर्चाही करता कामा नये इतकी ही मागणी बेजबाबदारपणाची आणि तितकीच देशद्रोही आहे पण आपल्या माध्यमात बसलेल्या काही लोकांचे भान सुटले आहे आणि ते यावर चक्क चर्चा करायला लागले आहेत. अशा चचार्र्ंतून काही लोकांना या बदमाषाबद्दल सहानुभूती वाटायला लागण्याची शक्यता आहे आणि अशा गैरसमजातूनच अफझल गुरूच्या फाशीवरून काश्मीर पेटला आहे हेही या माध्यमांना कळत नाही. पण कसल्याही औचित्यहीन चर्चा घडवायच्या आणि लोकांची दिशाभूल करायची अशी सवयच त्यांना जडली आहे. चर्चेला वाव दिला की अनेक लोक अनेक तांेडांनी बोलतात. संजय दत्त हा अट्टल बदमाष आहे हे खरे पण तरीही त्याला काही दुसरी बाजू आहे असे उगाचच लोकांना वाटायला लागते. खरे तर त्याच्या सगळ्या बाजू न्यायालयासमोर पुराव्या निशी मांडून झाल्या आहेत.
आता या सार्या संजूबाबाच्या भक्तांनी आता ती मांडण्याचे काहीही कारण नाही. संजय दत्त हा श्रीमंत असल्याने त्याने आपली बाजू मांडण्यासाठी देशातले नामवंत वकील उभे केले होते. ती विशेष न्यायालयात, उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात मांडून झाली आहे. तेव्हा आता माध्यमांतून ती कोणी मांडण्याची गरज नाही. तो किती प्रमाणात दहशतवादी आहे आणि किती प्रमाणात सभ्य याची छाननी झाली आहे आणि अंतिमत: निवाडा झाला आहे. न्या. काटजू यांच्यासार‘या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम केलेल्या माणसालाही ही बाब कळत नाही. ज्यांना ज्यांना तो अतिरेकी नाही असे वाटते त्यांनी आता बडबड करण्यापेक्षा न्यायालयात त्याची बाजू मांडायला हवी होती. आता मात्र उगाच माध्यमांचा टीआरपी वाढवण्यासाठी एका देशद्रोह्याची तरफदारी करण्याचा हा उद्योग चालला आहे. संजय दत्तने स्वत:च पत्रकार परिषदेत आपण साडेतीन वर्षे जेलमध्ये जाण्यास तयार असल्याचे आणि माफीसाठी प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ज्यांचा जीव कळवळतो आहे त्यांचे उमाळे थांबायला हवे होते पण आता हे लोक त्याच्यासाठी आपणहून प्रयत्न करायला तयार झाले आहेत. कमाल तर याच गोष्टीची वाटते. काटजूं सार‘या लोकांना त्याचा फारच पुळका येत आहे पण ते या निमित्ताने फार वाईट पायंडा पाडत आहेत याची त्यांना जाणीव नाही. या लोकांना संजय दत्त हा विनाकारण कैदेत जात आहे असे वाटते. ते खरे नाही पण भारतात अनेक कारागृहात विनाकारण अटक झालेले हजारो लोक आहेत. त्यातले कित्येकजण तर आरोपी आहेत. त्यांना अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत कच्चा कैदी म्हणून ठेवलेले आहे. ज्यांच्या खटल्याची सुनावणी वेळेवर होत नाही म्हणून ज्यांना खटला न चालता आणि दोषी न ठरताच कैदेत रहावे लागत आहे. मानवतेची फारच बूज राखण्याची या लोकांना हौस असेल तर त्यांनी या निरपराध लोकांसाठी प्रयत्न करावेत. संजय दत्तला निरपराध ठरवण्याचा प्रयत्न करणे हा एक प्रकारे न्यायालयाचा अपमान आहे. पण या कच्च्या कैद्यांना सोडवण्यात तसा काही प्रकार नाही. कारण त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेले नाही. पण त्यांना या लोकांची दया येत नाही. संजय दत्तचीच तेवढी दया येत आहे. त्यांची मानवता केवळ त्याच्यासाठीच वहायला लागली आहे. कारण तो चित्रपटात काम करतो म्हणूनच ना ? याचा अर्थ असा झाला की यांची मानवता सर्वांसाठी समान नाही आणि कायदाही सर्वांसाठी समान असावा असा त्यांचा आग‘ह नाही. चित्रपट अभिनेता हा असा काय स्पेशल माणूस असतो की त्यासाठी आपले कायद्याचे आणि मानवतेचेही नियम मोडावेेत ?
