पुणे दि .२७ – पुण्याच्या कोरेगांव पार्क भागातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे १५ एप्रिल रोजी देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पुणे दि .२७ – पुण्याच्या कोरेगांव पार्क भागातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे १५ एप्रिल रोजी देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
कोरेगांव पार्क भागातील या बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० ला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यात १७ जण ठार तर ५७ जण जखमी झाले होते. दहशतवाद विरोधी पथकाने या स्फोटासंदर्भात मिर्झा हिमायत बेग याला ७ सप्टेंबर २०१० रोजी अटक केली होती. या स्फोटामागे इंडियन मुजाहिद्नीनचा हात असून मुख्य संशय भटकळ बंधूंवर होता. मात्र दहशतवाद विरोधी पथकाने केवळ हिमायत बेग या एकमेव आरोपीलाच अटक करण्यात यश आले होते. त्यामुळे त्याच्याविरोधातच केस दाखल करण्यात आली.
या केसमध्ये एकूण १०९ साक्षीदार तपासले गेले. सरकारतर्फे विशेष वकील म्हणून अॅडव्होकेट राजा ठाकरे यांनी तर आरोपी बेग याच्यातर्फे अॅड. ए.रहमान आणि कायनात शेख या दोघांनी काम पाहिले. वकीलांचे युक्तीवादही पूर्ण झाले असून अंतिम निकाल १५ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.