श्रीलंकेत सार्वमत घेण्याची जयललिता यांची मागणी

चेन्नई,दि.27:तामिळ नाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी श्रीलंकेतील तामिळींच्या कायम स्वरुपी स्वास्थ्यासाठी श्रीलंकेतील तामिळीमध्ये सार्वमत घ्यावे अशी मागणी केली आहे. लंकन खेळाडू खेळत असलेले आयपीएलचे सामने तामीळनाडूमध्ये झाल्यास तामीळनाडूत तामिळनाडू राज्यातील शांतता बिघडेल, म्हणून कोणत्याही परिस्थितीत चेन्नईमधे ते क्रिकेट सामने होवू नयेत, अशी पंतप्रधानाकडे लेखी मागणी करताना श्रीमती जयललिता म्हणतात, पंतप्रधानांनी पुढाकार घ्यावा व श्रीलंकेत सार्वमत घेण्याची मागणी करावी व ते घडेल असे पहावे. श्रीलंकेत तामिळीवर अनन्वित अत्याचार झाले आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर तेथील तामिळी वंशाचे लोक श्री लंका सोडून गेले आहेत. जे बाहेर पडले आहेत, त्यांनाही त्या सार्वमतात भाग घेता आला पाहिजे.अशीही मागणी त्यंानी केली आहे. या संदर्भात संयुक्त राष्ट्र संघटनेने ठराव करावा लागेल त्यासाठीही भारताने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
यादृष्टीने केंद्र सरकारने त्यांच्या प्रयत्नाला गती देण्याची गरज आहे, असे त्या पत्रात म्हणत त्यांनी अशी मागणी केली आहे की, श्रीलंकेवर आर्थिक निर्बंध लादण्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

श्रीमती जयललिता यांनी तामीळनाडूतील आंदोलन करणार्‍या तरुणांना असे आवाहन केले आहे की, राज्यातील शांतता बिघडवून आपण आपले नुकसान करून घेत आहोत. त्याऐवजी माझे सरकार जे धोरण स्वीकारत आहे त्यामागे त्यांनी ठाम उभे रहावे.

Leave a Comment