श्रीदेवीच स्टायलिश अभिनेत्री

बॉलीवुडमधील स्टायलिश अभिनेत्री कोण अशी चर्चा अधून-मधून सुरु असते. तसा पाहिला तर हा प्रश्न कधीना कधी सर्वांनाच पडतो. त्याचे उत्तर प्रसिद्ध डिजायनर नीता लूला यांनी दिले आहे. बॉलीवुड मधील जवळपास सर्वच अभिनेत्रियोंची ड्रेस डिजायनीग नीताने केली आहे. मात्र त्यामध्ये अभिनेत्री श्रीदेवी हे तिचे पसंतीचे ग्राहक आहे. सर्वात जास्त स्टायलिशसुद्धा अभिनेत्री श्रीदेवीच असल्याचे तिने सांगून टाकले.

याबाबत बोलताना नीता म्हणाली, ‘श्रीदेवी हे माझे आवडते ग्राहक असून मी तिच्यासोबत १५-१६ वर्षांपासून काम करते. मी तिच्याकडून ब-याच गोष्टी शिकल्या आहेत. मी ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवीन आले होते.त्यावेळी माझ्यासाठी ती एक सहारा झाली होती. मी कितीपण कामात असले तरी तिच्यासाठी नेहमी वेळ काढते.’

नीताला डिजायनर म्हणून चारवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. श्रीदेवीचे कप़डे डिजाइन करयाला मला आवडतात. ती एक गुणी अभिनेत्री असून तिच्या अभिनयाने मीरिची सुद्धा भारावून गेले आहे. ती सर्व प्रकारच्या कपड्यात सुंदर दिसते. तिला प्रत्येक ड्रेस सूट होतो. त्यामुळे अन्य अभिनेत्रीच्या तुलनेत श्रीदेवी हीच सर्वात जास्त स्टायलिश अभिनेत्री असल्याचेही नीताने स्पष्ट केले .

Leave a Comment