दिल्लीत दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली- जामा मशीद परिसरातील एका गेस्ट हाऊसमधून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी रात्री उशिरा दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. पकडलेल्या संशयितांकडून पोलिसांनी एके-४७ रायफलीसह मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. दोन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक केल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.

गोरखपूर येथे हिजबुलच्या लियाकत नावाच्या दहशतवाद्याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीआधारे दिल्ली पोलिसांनी जामा मशीद परिसरातील गेस्ट हाऊसवर छापा टाकला. यावेळी याठिकाणी दोन संशयित दहशतवाद्यांना शस्त्रसाठ्यासह आढळून आले.

पकडलेले हे दोघेजण हिजबुल या संघटनेशी संबंधित आहेत. ते होळीच्या सुमारास दिल्लीत घातपात करण्याच्या उद्देशाने आले होते असे समजते. दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली जात आहे.