पोप तरूण कैद्यांचे पाय धुवून पहिली मास साजरी करणार

नवनिर्वाचित पोप फ्रान्सिस इस्टरच्या आधीची मास पुढच्या गुरूवारी रोममध्ये असलेल्या कॅसल डेम मर्मो युथ डिटेन्शन सेंटरमधील १२ तरूण कैद्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या पायांचे चुंबन घेऊन साजरी करणार आहेत. पोप फ्रान्सिस मुनोस एरिसमध्ये  आर्चबिचप असतानाही अशाच प्रकारे मास साजरी करत असत. व्हॅटिकन मध्ये ही मास रोम बॅसिलिका येथे साजरी केली जात असे पण पोप बेनेडिक्ट यांनी  २००७ पासून युथ ङिटेन्शन सेंटरमध्ये कैद्यांचे पाय धुण्याची सुरवात केली होती असे सांगण्यात येते.

इस्टर हा सण शुक्रवारी साजरा होत असून त्यापूर्वी म्हणजे २८ मार्चच्या गुरूवारी दुपारी ही मास पोप फ्रान्सिस साजरी करतील. ही परंपरा ख्रिस्ताच्या क्रूसीफिकेशनपासून ख्रिश्चन धर्मात पाळण्यात येते. यात १२ तरूण कद्यांचे ते खिस्ताचे १२ साथीदार समजून त्यांना दिल्या गेलेल्या अवमानकारक वागणुकीबद्लचा खेद म्हणून पाय धुतले जातात आणि पोप स्वतः हे काम करतात. पोप फ्रान्सिस असाच मास सेंट पीटर बासिलिकामध्येही करणार आहेत.

Leave a Comment