सोनम होणार मॉडर्न रेखा

बॉलीवुडची एक्ट्रेस रेखाची बरोबरी तर आज कोणतीच एक्ट्रेस करीत नाही. मात्र काही एक्ट्रेसेस आजपण रेखाची एक्टिंगची कॉपी करताना दिसतात. आगामी काळात अभिनेता अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर रेखाची बरोबरी करण्याचा विचार करीत आहे.

सोनम कपूर तिच्या आगमी काळात येत असलेल्या सिनेमात आभिनेत्री रेखाची ‘खूबसूरत’ या सिनेमातील रोल करणार आहे. या सिनेमाच्या रीमेकमध्ये ती रेखाचा रोल करीत आहे. त्यासाठी सोनम कपूरला रेखाने आशीर्वाद देखील दिला आहे. सोनम कपूर म्हणाली, ‘रेखाला बघितल्यानंतर मी खुपच खूष झाले आहे. माझी आणि रेखाजीची ‘ जब तक है जान’ या सिनेमाच्या प्रीमियरवेळी भेट झाली होती. मी सध्या ज्या सिनेमात काम करीत आहे.तो खूप मोठा सिनेमा आहे. ‘खूबसूरत’ हा सिनेमा १९८०मध्ये रिलीज झाला होता.’खूबसूरत’ या सिनेमाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते. यामध्ये मुख्य भूमिका रेखा, अशोक कुमार, दीना पाठक आणि राकेश रौशन यांनी केली होती. बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरला होता. रेखाने यामध्ये एका चुलबुली मुलीचा रोल केला होता.’

‘खूबसूरत’ सिनेमाचा रीमेक अनिल कपूर करीत आहे. दिग्दर्शन शंशांक घोष यांनी केले आहे. सोनमपण शशांकसोबत काम करण्यास खुपच उत्साहित आहे.सोनम कपूर या सिनेमात रेखाच्या कैरेक्टर कॉपी करीत नसून ती मॉर्डन लुकमध्ये झळकणार आहे.

Leave a Comment