दीपिका झाली रणबीरची नैना

सध्या अभिनेता रणबीर कपूर दिग्दर्शक आयन मुखर्जीच्या ‘ये जवानी है दीवानी’ च्या शूटिंग मध्ये बीजी आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री रणबीर कपूर त्याची पूर्व प्रेमिका दीपिका पदुकोन सोबत झळकणार आहे. या सिनेमात दीपिका ही नैनाचा रोल करीत आहे.

या सिनेमाच्या बाबतीत बोलताना अभिनेता रणबीर म्हणाला, ‘गेल्या काही दिवसपासून मी खुश आहे कारण की माझी पूर्वीची मैत्रीण दीपिका पादुकोन सोबत काम करणार आहे. मला परत एकदा दीपिका सोबत काम करण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे मी सध्या खुश आहे. तसे पहिले तर मला दीपिका सोबत काम करण्यात काहीच वाटत नाही. तसे पहिले तर दीपिका एक चांगली एक्ट्रेस आहे. ती कधी-कधी काम करीत असताना खूपच भावुक होते. मात्र ती महत्वाकांक्षी सुद्धा आहे. या सिनेमात दीपिका ही नैनाचा रोल करीत आहे.’

रणबीर आणि दीपिकाची जोडी ‘बचना ऎ हसीनों’ या सिनेमातून झळकली होती. तिच्या सोबत काम करताना मला काहीच अडचण वाटत नाही. यापूर्वी दोघांनी मिळून अनेक सिनेमात काम केले आहे. मात्र या सिनेमात काम करताना आम्ही खूप एन्जॉय केला आहे. दीपिका ही एक गुणी अभिनेत्री आहे. आम्ही दोघेपण व्यावसायिक असल्याने मला वाटते की दीपिकाला माझ्यासोबत काम करताना कसलीच अडचण येत नसेल असेही रणबीरने स्पष्ट केले.

Leave a Comment