अक्षयने टाकले तीन खानाला पाठीमागे

स्टारडमच्या बाबतीत अक्षय कुमार व तीन खान म्हणजेच सलमान, आमिर आणि शाहरुख यांच्यात सतत स्पर्धा लागलेली असते. मात्र इनकम टैक्स भरण्याच्या बाबतीत अक्कीने त्यांना केंव्हाच मागे टाकले आहे. अक्षयने यावर्षी १८ कोटी रुपये अडवांस टैक्स म्हणून जमा केले आहेत. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान अडवांस टैक्सपेयर्सच्या लिस्टमध्ये मात्र अक्षयकुमारच्या पाठीमागे आहे.

अभिनेता अक्षय कुमार १८ कोटी, सलमान खान ११ कोटी, शाहरुख खान १०.५ कोटी, आमिर खान ८ कोटी, अभिनेत्री कटरीना कैफ ४.५ कोटी, करीना कपूर ४ कोटी, प्रियंका चोप्रा २ कोटी इतके टैक्स भरले आहे. याबाबतीत बोलताना अक्षय कुमार म्हणाला, टैक्स भरून कोण काही उपकार करीत नाही. आम्ही फक्त प्रामाणिकपणे टैक्स भरण्याचे काम करतो. मला मनापासून वाटते की सर्वांनी टैक्स भरावा. टैक्स भरने ही प्रत्येकाची जबबदारी आहे. त्यामुळे मी स्वताला काही महान समजत नाही. मात्र देशाचा जबाबदार नागरिक असल्याचा गर्व आहे.’

टैक्स भरल्यानंतर सरकार प्रत्येकाला किती तरी सुविधा उपलब्ध करून देता येतात. तुम्ही जर टैक्स नाही भरले तर ते कधीच शक्य नाही. मी प्रत्येक वर्षी आठवणीने टैक्स भरतो. त्यामुळे मला कसलेच टेन्शन येत नाही. मी जेवढे कमवितो त्याचे टैक्स न चुकता भरत असल्याचे ही अक्षयने स्पष्ट केले.

Leave a Comment