चेतनच्या स्टोरीला दिली सलमानने ‘किक’

प्रसिद्ध लेखक चेतन भगत गेल्या काही दिवसापासून सलमान खानसाठी स्टोरी लिहित आहे. या सिनेमाचे नाव ‘किक’ असून दिग्दर्शक साजिद नाडियावाला हा सिनेमा घेऊन येत आहे. मात्र लेखक चेतनच्या या स्टोरीला सलमान खानने नुकताच नकार दर्शविला आहे. या स्टोरीला सलमानने पसंत नसल्याच्या कारणावरून किक मारली आहे.

चेतनने लिहलेली ही स्टोरी सलमान खानला आवडली नाही. त्यामुळे त्याने चेतनला नकार दर्शविला आहे. या स्टोरीत मसाला नाही. त्यामुळे ही स्टोरी सलमानला आवडली नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा चेतनला या सिनेमाची स्टोरी लिहावी लागणार आहे.

चेतनला सलमान खान त्याने लिहलेली ही स्टोरी नाकारेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. सध्या चेतन भगतने पुन्हा एकदा ही स्टोरी लिहण्यास घेतली आहे. सध्या तो पुन्हा एकदा किक या स्टोरीवर लिखाण करित आहे. चेतनच्या ‘थ्री मिस्टेक्स ऑफ़ माय लाइफ’ या प्रसिद्ध नॉवेलवर अभिषेक कपूरने ‘काईपोछे’ हा सिनेमा तयार केला आहे. त्याच्या कहानीवर त्याने कोटयवधी रुपये कमविले आहेत. दूसरीकडे मात्र सलमानने चेतनची स्टोरी नाकारली असल्याने तो घाबरून गेला आहे.

Leave a Comment