भावना जाणून घेण्यात पुरूषांपेक्षा महिला अधिक सक्षम

लंडन – एखाद्याची भावना जाणून घेण्यात पुरूषांपेक्षा महिलाच अधिक सक्षम असतात असा अनुभव आहे. तथापि आता ते नव्या चाचणीनेही सिद्ध झाले आहे. इंग्लडच्या एडीनबर्ग विद्यापीठाने संशोधन करून हा निष्कर्ष सप्रमाण सिद्ध केला आहे. चेहर्‍यावरील भावना ओळखण्यास पुरूषांना विलंब लागतो परंतु महिला त्या अधिक वेगाने ओळखू शकतात असा या पाहाणीचा निष्कर्ष आहे.

महिला आणि पुरुषांच्या गटाला विविध चेहर्‍यांचे फोटो दाखवून त्यांच्या भावना ओळखण्यास सांगण्यात आले. आणि त्या कालावधीत या गटातील महिला आणि पुरूषांच्या मेंदूतील बदलही नोंदवण्यात आले. त्यात महिला सरस ठरल्या असा या पहाणीचा निष्कर्ष आहे.

दुसर्‍याच्या भावना ओळखण्यात महिला अधिक सक्षम असल्या तरी स्वत:चे मत ठरवण्यात मात्र पुरूषांपेक्षा कमी सक्षम असल्याचे या पहाणीत आढळून आले आहे. प्रा. स्टीफन लॉरी यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. ते म्हणाले की; पुरुषांचे दुसर्‍यांबद्दलचे अंदाज बर्‍याच वेळा चुकतात. त्यांना फेस रिडींग करताना बराच वेळ लागतो. भावनांमधील फरक समजण्यातही पुरूषांना अवघड जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment