दीपिकाचा जादू वर्षभर चालणार

या वर्षभरात मोठ्या पडद्यावर अभिनेत्री दीपिका पादुकोणचा जादू चालणार असेच दिसते. दीपिकाचा जादू चालणार म्हणजे काय होणार असा विचार कदाचित तुम्ही करत असाल. मात्र आगामी काळात अभिनेत्री दीपिकाचे बैक टु बैक सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामुळे हे वर्ष तिच्या करीयरच्या दृष्टीने मह्त्वाचे आहे.

तसे पहिले तर तिच्या या वर्षाची सुरुवात मे महिन्यापासून होणार आहे. ३१ मे रोजी तिचा ‘ये जवानी है दीवानी’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. या मध्ये ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत झळकणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी दोघेजण पुन्हा जवळ आल्याने दोघाची लवस्टोरी पुन्हा एकदा सुरु झाली अशी चर्चा होती.

‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमानंतर लगेचच ऑगस्ट महिन्यात तिचा बहुचर्चित ‘चेन्नैइ एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. यामध्ये ती शाहरुख खानच्या अपोजिटरोल करित आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीने या सिनेमाची रिलीज डेट ८ ऑगस्ट फायनल केली आहे. त्यानंतर दिग्दर्शक संजय लीला भंसालीचा ‘रामलीला’ सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका पहिल्यांदा रणवीर सिंहसोबत झळकणार आहे. सध्या हे दोघेजण खूप जवळ आल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वीच दोघेजण दुबईमध्ये मस्ती करताना दिसले होते.

‘रामलीला’ या सिनेमाची रिलीज डेट अजून फायनल झाली नाही. पण अक्टूबरमध्ये हा सिनेमा रिलीज होईल असे मानले जात आहे. त्याशिवाय दीपिकाचा रजनीकांतच्या अपोजिट असलेला ‘कोच्चेदैयां’ हा सिनेमा रिलीज होणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment