आमिर साजरा करणार कैटरिनासोबत ‘बर्थ डे’

अभिनेता आमिर खानचा १४ मार्च रोजी वाढदिवस असतो. परफेक्शनिस्ट खान मुंबई मध्येच त्याचा वाढदिवस साजरा करीत असतो. गेल्या काही दिवसापासून तो स्विट्जरलैंड मध्ये ‘धूम -३’ सिनेमाचे शूटिंग करीत आहे. आमिरला वाटले तर त्याने १४ मार्च रोजी ब्रेक घेतला असता. मात्र आमिर नेहमीच त्याच्या कामाला प्राथमिकता देत असतो. त्यामुळेच त्याने वाढदिवसा दिवशी सुद्धा शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी तो अभिनेत्री कैटरिना कैफसोबत बर्थ डे सेलिब्रेट करणार आहे.

काही दिवसापूर्वीच आमिरने दिग्दर्शक राजकुमार हिरानीच्या पी.के या सिनेमाचा पहिला शेड्यूल राजस्थानमध्ये पूर्ण केला. त्यानंतर त्याने ‘धूम-३’ सिनेमाच्या शूटसाठी लगेचच स्विट्ज़रलैंड गाठले आहे. आमिरसोबत यावेळी कैटरिना कैफ, अभिनेता अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रापण उपस्थित राहणार आहेत. तसे पहिले तर ‘धूम-३’ या सिनेमाची ओळख एक क्लाइमेक्स सिनेमा म्हणून होत आहे. आमिरने शूटनंतर बर्थडे पार्टीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये ‘धूम-३’ या सिनेमाची पूर्ण टीम सहभागी होणार आहे.

काही दिवसापूर्वीच आमिरने एका जाहिरातीसाठी जगभरातील सर्वात मोठा करार केला आहे. लवकरच तो या जाहिरातीमध्ये झळकणार आहे. येत्या काळात ‘पी. के.’ आणि ‘धूम-३’ हे दोन मोठ्या बनरचे सिनेमे लवकरच येणार असल्याने त्याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.