बाहरैच – उत्तर प्रदेशात राबिपूर परिसरात ऑनर किलिंगच्या संशयित प्रकारातून भावानेच आपल्या २० वर्षीय बहिणीचे शिर धडापासून अलग करण्याची घटना घडली. माहरून असे दुर्देवी बहिणीचे नाव आहे.

बाहरैच – उत्तर प्रदेशात राबिपूर परिसरात ऑनर किलिंगच्या संशयित प्रकारातून भावानेच आपल्या २० वर्षीय बहिणीचे शिर धडापासून अलग करण्याची घटना घडली. माहरून असे दुर्देवी बहिणीचे नाव आहे.
ताजपूर गावातील एका ५० वर्षीय व्यक्तीशी विवाह करण्याची तिची इच्छा होती. मात्र हे तिच्या भावाला पसंत नसल्याने त्याने आपल्या बहिणीची हत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलीस अधीक्षक विनयकुमार यांदव यांनी दिली.
माहरूनच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी तिचे शव ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. त्याचप्रमाणे आपल्याच बहिणीची हत्या करणार्या भावालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरूद्ध भादंविच्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.