दीपिका शाहरूखवर नाराज

महिला दिवसानिमीत अभिनेत्री दीपिका पादुकोणला खुश करण्यासाठी अभिनेता शाहरूख खानने ‘चेन्नई एक्सप्रेस’ च्या कास्टिंगमध्ये त्याच्या नावापूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव घालून सन्मान केला आहे. तर दूसरीकडे मात्र दीपिका शाहरूखवर नाराज असल्याचे समजते. किंग खान दीपिका आणि तिचा नवा मित्र रणवीर सिंहच्या बाबतीत बोलताना काही तरी वेगळेच बोलून गेला. त्यामुळे दीपिका शाहरूखवर नाराज असल्याचे समजते.

हा सगळा प्रकार ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाच्या सेटवर घडला. या प्रकारामुळे नाराज झालेल्या दीपिकाने शाहरूख सोबतचे बोलणे बंद केले आहे. मात्र दीपिकाची नाराजी किंग खानला स समजल्यानंतर त्याने लगेचच दीपिकाची माफी मागितली. ‘ चेन्नई एक्सप्रेस’ हा रोहित शेट्टीचा सिनेमा आहे. या ईदच्या मुहर्तावर हा सिनेमा रीलिज होणार आहे.

काही दिवसापासून दीपिका आणि रणवीर सिंह यांच्यामध्ये काही तरी सुरु आहे. रामलीला सिनेमात दोघे एकत्रित काम करित आहेत. अभिनेता रणवीर सिंहने दीपिका त्याला खुप आवडते असे सांगितले आहे. मात्र या सर्व प्रकाराला आताच अफयेर म्हणणे चुकीचे ठरेल. तसे पहिले तर दीपिका पादुकोणने यापूर्वी अभिनेता रणबीर कपूर आणि सिद्धार्थ माल्या सोबत डेटिंग केली आहे.

Leave a Comment