ब्रिटन शाही दांपत्याला मुलगी होणार ?

प्रिन्स विलिम्स आणि डचेस ऑफ केंब्रिज केट मिडलटन यांचे पहिले वहिले अपत्य जुलै मध्ये ड्यू आहे. राजघराण्याला वारस मिळणार म्हणजे राजा मिळणार की राणी याची उत्सुकता सर्वसामान्य ब्रिटीशवासियांनाही आहेच. त्यातच केटने अगदी चुकून आपल्याला मुलगी होणार असल्याची हिंट दिल्याने हे अपत्य मुलगीच असेल याची खात्री ब्रिटनवासीयांना वाटू लागली आहे.

त्याचे झाले असे की युवराज्ञी केट नॉर्थ इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमासाठी गेली असता, तेथे जमलेल्या माहिलांपैकी एकीने केटच्या बाळासाठी म्हणून एक टेडी बेअर भेट म्हणून दिले. त्वरीत केटने ‘ मी हे माझ्या मुलीसाठी ठेवीन‘ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. त्यावर तुम्हाला मुलगी होणार आहे काय असा प्रश्न तिला विचारला गेला तेव्हा मात्र तिने चटकन माय बेबी असा उल्लेख केला. मात्र तोपर्यंत समझनेवालोंको इशारा काफी होता है या उक्तीप्रमाणे संबंधित महिला काय समजायचे ते समजल्या.

ब्रिटीश प्रसारमाध्यमांनीही या घटनेची त्वरीत दखल घेऊन ब्रिटनला राणी मिळण्याचे संकेत मिळाल्याचे वृत्त छापून टाकले आहे.

Leave a Comment