डीएसपीच्या मृत्यूनंतर नवा वाद

देवरिया- सरकारने कुंडा येथे शहीद झालेले डीएसपी झियाउल हक यांच्या मृत्यूनंतर आता आणखीन एका नवीन वादास तोंड फुटले आहे. उत्तरप्रदेश सरकारने कुटुंबातील पाच सदस्‍यांना नोकरी देण्‍याचे आश्‍वासन दिले आहे. यावरून शहीद डीएसपी यांच्‍या पत्‍नी परवीन आणि त्यांचे भाऊ सोहराब अली यांच्यात वाद सुरु झाला आहे. परवीन यांनी या यादीत माहेरच्या लोंकाचा समावेश केला असल्यचा आरोप अली यांनी केला आहे. या गृहकलाहमुळे आता सरकार समोर नवा पेच निर्माण झाला आहे.

शहीद डीएसपी यांच्‍या पत्‍नी परवीन यांनी आठ लोकांच्‍या नावाची सूची प्रशासनास दिली आहे. यामध्‍ये त्‍यांनी आपल्‍या माहेरच्‍या लोकांचा समावेश केला आहे. नोकरीमध्‍ये कुटुं‍बातील व्‍यक्‍तींना प्राधान्‍य दिले पाहिजे. मात्र, परवीन यांनी त्‍यांच्‍या चुलत भाऊ, बहिणीच्‍या नावाला प्राधान्‍य दिल्‍याचा आरोप दिवंगत हक यांचे भाऊ सोहराब अली यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सोहराब अली म्‍हणाले, ‘ नोकरीमध्‍ये कुटुं‍बातील व्‍यक्‍ती म्हणून परवीन यांना प्राधान्‍य मिळायला पाहिजे. त्‍यानंतर आमच्‍या कुटुंबातील सदस्‍यांना महत्‍व दिले गेले पाहिजे. त्‍यांनी जी यादी प्रशासनाकडे दिली आहे. त्‍यात आपल्‍या माहेरच्‍या लोकांचा समावेश करण्‍यात आला आहे.’

प्रशासनाकडे सादर करण्यात आलेल्या यादीत परवीन यांच्‍याशिवाय दीर सोहराब अली, परवीन यांची छोटी बहीण फरहीन आझाद, नणंदेचे पती मुजीबर रहमान, बहिणीचे पती इस्‍माईल अहमद, ननंद कनीज फातिमा, रझिया खातून आणि चुलत दीर रूस्‍तम अली यांच्‍या नावाचा समावेश असल्याचे समजते.