नवी दिल्ली दि.२३ -मोबाईल हँडसेट उत्पादनातील अग्रगण्य कंपनी असलेल्या सोनी इंडियाने त्यांच्या सोनी एक्सपिरीया उत्पादनासाठी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कटरिना कैफ हिला ब्रँड अँबॅसिडर नेमले असून तिच्याशी तसा दोन वर्षांचा करारही केला आहे. मार्च २०१३ पासून कटरिना या उत्पादनाची जाहिरात करणार आहे.
कंपनीचे प्रमुख तडाटो किमुरा याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की कटरिना युथ आयकॉन आहे. तिच्या व्यक्तीमत्त्वाची भुरळ तरूणाईवर मोठी आहे. आमचे एक्सपिरिया स्मार्टफोन तरूण वर्गाला नजरेसमोर ठेवूनच तयार केले गेले आहेत त्यामुळे आमच्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठी कटरिना हा योग्य चॉईस आहे. कटरिना प्रमाणेच आमचे फोनही स्टायलिश, फॅशनेबल आणि फिट आहेत.
सोनी या वर्षात भारतात मार्केटिंग क्षेत्रासाठी तिप्पट म्हणजे ३०० कोटीं खर्च करणार आहे. त्या दृष्टीने एक्सपिरिया हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे. जाहिरातींबरोबरच कंपनी आउट डोअर कॅम्पेनही राबविणार असून त्यात दुकानांसमोर डिस्प्ले, रोड शोज तसेच सिनेमा आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाणार आहे असेही किमुरा यांनी सांगितले.