सुपर्ण वर्मा दिग्दर्शित ‘आत्मा’ हा सिनेमा लवकरच येत आहे. या सिनेमाची नायिका म्हणून अभिनेत्री बिपाशा बासुचे नाव घेतल्यानंतर नवाज़च्या तोंडातून ‘ओह माय गॉड’ असे उच्चारले गेले होते . तर दुसरीकडे नवाज़चे नाव ऐकून बिपाशा सुद्धा खुश झाली होती.

‘आत्मा’ या सिनेमात बिपाशाचा हिरो म्हणून नवाजचा नाव ऐकून बिपाशा खूप खुश तर झाली होती मात्र तिच्या तोंडातून काहीच शब्द उच्चारले गेले नव्हते. मात्र तिच्या चेह-यावरील आनंद सर्व काही सांगून जात होता. ही बाब खुद्द बिपाशानेच बोलताना शेअर केली.
बिपाशाच्या मते,’ सुजॉय घोषच्या सिनेमापासून ती नवाज़ची फैन आहे. त्या सिनेमातील विद्या बालन च्या एक्टिंगने जेवढे इम्प्रेस केले होते तेवडेच आईबी ऑफिसरच्या रूपतिल नवाज़ने तिला इम्प्रेस केले होते. हा सिनेमा बघितल्यानंतर मी सुजॉयला फोन करून हा आईबी ऑफिसर कौन आहे याची चौकशी केली होती. त्यावेळी सुजॉयने मला तो नवाज़ुदीन सिद्दीकी असल्याचे सांगीतले होते. मात्र त्यानंतर सुपर्णने मला ‘आत्मा’ सिनेमात माझ्या सोबत नवाज़ुद्दीन सिद्दीकी काम करणार असल्याचे सांगितल्याने मी खूपच खुश झाले होते.’ तसे पहिले तर बिपाशा ही प्रेक्षकासाठी नवी नाही. मात्र नवाज़ची जोड़ी जरी नवीन असली तरी बिपश्ने मात्र तिचा जोडीदार निवडला आहे.