अमृता राव झळकणार बिग बी सोबत

दिग्दर्शक प्रकाश झा ने आगामी काळात येत असलेल्या ‘सत्याग्रह’ या सिनेमासाठी अभिनेत्री अमृता रावची निवड केली आहे. त्यामुळे सध्या अमृता राव खूपच खुश दिसत आहे. या सिनेमात तिचे जास्तीत जास्त सीन अभिनेता अमिताभ बच्चन सोबत आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अमुताची भूमिका अन्ना हजारेचा कार्यकर्ता म्हणून आहे. याबाबत बोलताना अमृता राव म्हणाली, ‘ सध्या भोपाल मध्ये शूटिंग सुरू आहे. ‘सत्याग्रह’ या सिनेमातील बरेचसे सीन अमिताभ बच्चन सोबतचे आहेत. या सिनेमातील जवळजवळ ९९ टक्के दृश्य बिग बी सोबत आहेत. त्यामुळे माझ्या दृष्टीने ही एक चांगली बाब आहे.’

‘मैं हूं ना’ आणि ‘विवाह’ या दोन सिनेमानंतर तिची शेवटची चांगली भूमिका असलेला ‘वेलकम टू सज्जनपुर’ हा सिनेमा आला होता. त्यानंतर तिचे अधिकतर सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत.
‘सत्याग्रह’ मधील तिची भूमिका करियरच्या दृष्टीने एक निर्णायक मोडवर आहे. मात्र तिने याबाबत काही खुलासा केला नाही.

‘सत्याग्रह’ या सिनेमात तिच्या सोबत अभिनेता अजय देवगन, अर्जुन रामपाल आणि मनोज वाजपेयीसारखे दिग्गज अभिनेता व अभिनेत्री करीना कपूर काम करीत आहेत. या सिनेमात ती एक पत्रकाराची भूमिका करीत आहे.

Leave a Comment