सोहावर झाला सैफ नाराज

अभिनेत्री सोहा अली खान लवकरच तिग्मांशु धुलियाच्या ‘साहेब बीवी और गैंगस्टर रिटन्स’ या सिनेमातून झळकणार आहे. या सिनेमात इरफान खान सोबत ती प्रमुख भूमिका करीत आहे. यामध्ये सोहाने काही बोल्ड सीन्स केले आहेत. सोहाने बोल्ड सिन्स केल्याने सैफ अली खान तिच्यावर खूपच नाराज झाला आहे.

‘साहेब बीवी आणि गैंगस्टर’ मध्ये माही गिलने सुद्धा बोल्ड सीन केले आहेत. त्याची चर्चा सध्या बोलीवूडमध्ये रंगली आहे. त्यामुळे सोहापण असेच नखरे करीत आहे. “बुलेट राजा” या सिनेमाच्या शूटिंगवेळी तिग्मांशुने सैफला “साहेब बीवी और गैंगस्टर रिटन्र्स” या सिनेमाचे काही सीन दाखविले. ज्यामध्ये सोहा आणि इरफानचे काही सीन आहेत. हे दृश्यपाहून सैफ खूपच नाराज झाला आहे. सैफला त्याच्या बहिनेने असे सीन केलेले पसंत पडले नाही.

आतापर्यंत साधी भूमिका करणार सोहाने पाहिल्यांदा बोल्ड रोल केला आहे. ‘ साहेब बीवी आणि गैंगस्टर रिटनस” मध्ये जिमी शेरगिल, माही गिल, इरफान आणि सोहा मुख्य भूमिका करणार आहे. हा सिनेमा ८ मार्च रिलीज होणार आहे.

Leave a Comment