सल्लूला व्हायचंय कुवांरा बाप

मुंबई: तू लग्न केव्हा करणार;हा प्रश्‍न सलमानला एखादा राष्ट्रीय प्रश्‍न असल्यासारखा प्रत्येकवेळी विचारला जातो. याप्रश्‍नावर यावेळी मात्र त्याने मजेशीर उत्तर दिले आहे. सलमान म्हणतो की; माझं लग्न केव्हा होणार; हे मी सांगू शकत नाही मात्र मला मुले हवीत आणि लग्न न करता मुले कशी होतील याचा विचार सध्या मी करतोय.’

बॉलिवुड ’दबंग’ सलमान आणि इतर खान मंडळींमध्ये विस्तव जात नाही. नेहमीच कोणाशी ना कोणाशी पंगा घेणारा सलमान आपल्या चाहत्यांसाठी मात्र वाट्टेल ते करायला तयार असतो. सध्या ऑनलाइन विश्वाचा वाढता पसारा लक्षात घेऊन सलमाननेही आपल्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी गुगल प्लसचे हँगआऊट जॉईन केले आहे.

फेसबुक आणि ट्विटरबरोबर आता सल्लू गुगल प्लसच्या माध्यमातूनही चाहत्यांशी संवाद साधतोय. गुगल प्लस हँगआऊटवर एका चाहत्याने सलमानला लग्नाबाबतच पहिला प्रश्‍न विचारला. त्यावर सलमानने ’लग्न बिग्न मला काही माहीत नाही मात्र मला मुले खूप आवडतात. मला मुले हवी आहेत. लग्न टाळून मुले असावीत असा माझा विचार आहे’; असे उत्तर त्याने या चाहत्याला दिले आहे.

Leave a Comment