कैतरिना करणार मधुबालाचा रोल

आगामी काळात दिग्दर्शक सुजीत सरकार हे किशोर कुमारवर यांच्या जीवनावर आधरित असलेल्या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. यामधील किशोर कुमारचा रोल अभिनेता रणबीर कपूर करणार आहे. तर दुसरीकडे मधुबालाच्या रोलसाठी कैतरिना कैफशी चर्चा करणार आहे.

हा सिनेमा निर्मिती करण्याची इच्छा सुजीतने खुप वर्षापासून व्यक्त केली आहे. त्यावेळेस पासूनच रणबीर कपूरची निवड किशोर कुमारच्या रोलसाठी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर बराच काळ हा सिने निर्मितीचे काम रखडले होते. खासकरून लीजैंड्री एक्ट्रैस किशोर कुमारची वाइफ मधुबालाचा रोल कोण करणार याची समस्या भेडसावत होती.

आता ही समस्या सुटली असून हीरोइन पैकी अभिनेत्री कैटरीना कैफची या रोलसाठी निवड करण्यात आली आहे. तसे पहिले तर कैटरीनाचा चेहरा हा मधुबालाशी मिळता-जुळता आहे. त्याशिवाय तिचे अभिनयाचे टैलेंटपण मधुबालाशी मिळते जुळते आहे. लवकरच या बहुचर्चित सिनेमाची शुटींग सुरु होणार असून या मधील कैटरीनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment