‘मेरठ जंक्शन’ मधून झळकणार अभिषेक

गेल्या काही दिवसापासून दिग्दर्शक आनंद कुमार त्याच्या ‘जिला गाजियाबाद’ या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. तर दुसरीकडे त्याने आगामी काळात येत असलेल्या नवीन सिनेमाचे काम करणे सुरु केले आहे.

कुमार त्याच्या ‘मेरठ जंक्शन’ या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चनला मुख्य भूमिका देण्याचा विचार करीत आहे. याबाबत बोलताना दिग्दर्शक आनंद कुमार म्हणाला, ” आगामी काळात येत असलेल्या ‘मेरठ जंक्शन’ या सिनेमाची पटकथा पूर्ण झाली आहे. हा संपूर्ण ग्रामीण सिनेमा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असनार आहे. सध्या मी या सिनेमाच्या बाबतीत त्याच्याशी संपर्क साधला आहे. अभिषेकला या सिनेमाची कथा आवडली आहे. बाकी बोलणे सुरु आहे. सर्वकाही ठीक झाले तर या सिनेमाची शूटिंग आगामी काळात लवकरच सुरु होणार आहे.’

कुमारच्या मते अभिषेक हा निवडक अभिनेत्या पैकी एक आहे. या सिनेमातील रोलला तो शोभतो. अभिषेक जरी शहरात राहणारा आधुनिक युवक असला तरी या सिनेमातील त्याची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Leave a Comment