ईदला सलमान, अक्षय व सनीमध्ये मुकाबला

यावर्षी ईदच्या मोक्यावर सलमान खानचा ‘मेंटल’ आणि अक्षय कुमारचा ‘वंस अपॉन ए टाइम इन मुंबई रिटर्न्स’ या दोन सिनेमात मुकाबला पाहण्यासाठी तुम्ही जर एक्साइटेड झाला असाल तर त्यांच्यासाठी आणखीन एक खुशखबर आहे. यावर्षीचा मुकाबला आणखीनाच आगामी काळात मजेदार होणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता सनी देओलचा ‘सिंह साहब द ग्रेट’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असल्याचे समजते. तर दुसरीकडे खिलाडी अक्षयकुमारचा ‘वंस अपॉन…’ हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी खूप दिवसापूर्वी केली आहे. तसे पहिले तर अजून टायगर सल्लूने त्याचा आगामी काळात येत असलेल्या ‘मेंटल’ या सिनेमाची रिलीज डेट अनाउंस केली नाही. मात्र त्याचा आजपर्यतचा इतिहास पहिला तर सल्लूचा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर येणार हे निश्चित आहे.

त्यामुळे आगामी काळात ईदच्या मुहूर्तावर या बॉलीवूडच्या तीनों स्टार्समध्ये मुकाबला रंगणार आहे. या मुकाबल्यातून आता कोण माघार घेतो हे आगामी काळात समजून येणार असून अजून त्यासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे.

Leave a Comment