शाहरुख झळकणार छोट्या पडद्यावर

गेल्या काही दिवसपासून बॉलीवूडचा किंग खान शाहरुख पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्याची तयारी सुरु केली आहे. सूत्रोंने दिलेल्या माहितीनुसार तो छोट्या पडद्यावरील गेम शो ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं?’ याच्या सेकंड सीजनसाठी शाहरुखला अप्रोच करण्यात आले असल्याचे समजते.

यापूर्वी २००८ साली अभिनेता शाहरुख खानने ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं?’ या शोच्या फर्स्ट सीजनमध्ये होस्ट म्हणून काम केले होते. त्यानंतर बरेच दिवस एसआरके हा छोट्या पडद्यावर झळकला नव्हता. गेल्या काही दिवसापासून अभिनेता सलमान खान, अमिताभ बच्चन आणि आमिर खान या सुपर स्टार्स मंडळींनी टीवीवर सध्या धमाल माजविली आहे. त्यांच्या तुलनेत सध्या शाहरुख बराच पाठीमागे पडला आहे. त्यामुळे त्याने आता या शो च्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

या शो मध्ये शाहरुख सहभागी व्हावा म्हणून निर्माता मंडळींनी किंग खानशी संपर्क साधला असून या शो साठी शाहरुखच त्यांची राइट चॉइस असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात किंग खान ही ऑफर स्वीकरतो की नाकरतो यावर बरेचसे काही अवलंबून राहणार आहे.

Leave a Comment