अजून लग्न केलेले नाही- सुशांत

बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची पार्टनर अंकिता लोखंडेने अजून लग्न केलेले नाही. गेल्या काही दिवसापासून दोघानी लग्न केल्या असल्याच्या अफवा पसराविल्या जात आहेत. जेंव्हा आम्ही तसा निर्णय घेऊ त्यावेळी सर्वाना सांगूनच लग्न करणार असल्याचा खुलासा अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी केला आहे.

याबाबत बोलताना सुशांत म्हणाला, ‘ गेल्या तीन वर्षापासून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र त्यामध्ये लपविण्यासारखे काहीच नाही. आम्ही दोघानीपण आमच्या रिलेशन बाबतीत सर्वाना सांगितले आहे. त्यामुळे आता लपविण्यासारखे काहीच उरले नाही. जेंव्हा आम्ही लग्न करण्याचे ठरवू त्यावेळी सर्वाना सांगूनच हा निर्णय घेणार आहे. लग्न झाल्यानंतर पटना, इंदौर आणि मुबईमध्ये पार्टी देणार आहे. ‘

अंकिता आगामी काळात येत असलेल्या सुशांतच्या ‘काई पो चे’ या सिनेमाबाबत खूपच उत्साहित आहे. हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे. सुशांतपण हा पहिलाच सिनेमा असल्याने थोडासा घाबरालेला आहे. सुशांत आणि अंकिताने छोट्या पडद्यावरिल ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्रित काम केले आहे. त्यावेळेस पासून त्याची लव केमेस्ट्री जुळली आहे. त्यावेळेस पासून दोघेपण रिलेशन सांभाळून आहेत.

Leave a Comment