जॉन करणार प्रियाशी लग्न

मुंबई: बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या गर्लफ्रेंड प्रिया सोबत लग्न करणार आहे. जॉनची बॉलीवुडची ‘हॉट गर्ल’ बिपाशा बसूसोबत नऊ वर्ष ‘रिलेशनशिप’ होती. गेल्या वर्षी बिपाशा सोबत त्याचा ‘ब्रेक अप’ झाला. गेल्या काही दिवसापासून अभिनेता जॉन याचे अनेक अभिनेत्रिशी ‘लिंक-अप’ असल्याची चर्चा होती. मात्र आता जॉनच्या या रहस्‍यावरून पडदा उठवला आहे.

जॉननेच या बाबतीत खुलासा केला आहे. अनिवासी भारतीय प्रिया रुचाल ही त्याची ‘लेडी लव’ असणार आहे. हिमाचल प्रदेशातील मॅकलोडगंजमध्ये राहणारी प्रिया आता अमेरिकेची नागरिक आहे. २० वर्षीय प्रिया वित्त विश्लेषक आणि इन्‍वेस्‍टमेंट बँकर आहे. सध्या वर्ल्‍ड बँकेत ती कार्यरत आहे.

सूत्राने दिलॆल्या माहितीनुसार प्रियाने शिक्षण होईपर्यंत जॉनला वाट पहावी लागणार आहे. दोन वर्षानंतर प्रियाचे एमबीए पूर्ण होणार आहे. त्यानंतर दोघेजण लग्न करणार आहेत २०१५ साली जॉन आणि प्रिया लग्न करतील. जॉन आणि प्रियाची भेट २०१० मध्ये मुंबईमध्ये झाली.

Leave a Comment