जालियानवाला हत्याकांड लाजीरवाणे: कॅमेरॉन

अमृतसर: ब्रिटीश राजवटीत घडलेले जालियनवाला हत्याकांड हा ब्रिटीश इतिहासातील अत्याधिक लाजीरवाणा प्रसंग होता; अशा शब्दात ब्रिटीश पंतप्रधान डेव्हिड केमेरोन यांनी अमृतसर भेटीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

या ठिकाणी जनरल डायर याच्या हुकुमावरून ब्रिटीश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शांततापूर्ण निषेध करणार्‍या सुमारे १ हजार आंदोलकांचा झालेला मृत्यू विसरण्याजोगा नाही; असे सांगून कॅमेरॉन यांनी जालियनवाला बागच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

ब्रिटन शांततामय रीतीने विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य नेहेमीच जपेल; अशी ग्वाही देऊन कॅमेरॉन म्हणाले की; ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी जालियानवाला हत्याकांडाचे ‘एक राक्षसी कृत्य’ या शब्दात केलेले वर्णन अगदी यथार्थ आहे.

जालियानवाला बागेला भेट देण्यापूर्वी केमेरोन यांनी सुवर्ण मंदिरालाही भेट देऊन गुरु गादीला वंदन केले.

Leave a Comment