मैनेचे अश्लील बोल

ही कथा आहे चीनमधल्या जाऊफेंग फॉरेस्ट झूमधली. सेंट्रल चायनातील या झूमध्ये प्रेक्षकांचे स्वागत करण्याचे काम एका मैनेकडे होते. राघु मैना जोडीतील ही मैना बरं का!. पोपटाप्रमाणेच मैनाही बोलायला शिकविले तर बोलते. ही मैना जरा जास्तच हुषार म्हटली पाहिजे. कारण ती केवळ स्वागताची वाक्ये शिकून थांबली नाही तर पिजर्यां जवळ येणार्याण प्रेक्षकांचे बोलणेही ती सहीसही उच्चारू लागल्याने झूचे केअर टेकर जरीस आले आहेत.

ही मैना गेले काही दिवस अर्वाच्च भाषा बोलते आहे. मैनेचे हे अश्लील बोल प्रेक्षकांची करमणूक करत असले तरी झू व्यवस्थापनाला त्यामुळे डोकेदुखी निर्माण झाली आहे. परिणामी तिची ही भाषा अन्य पक्ष्यांनी मुखोद्गत करू नये म्हणून तिला एकांतवासात ठेवण्यात आल्याचे समजते. इतकेच नव्हे तर पक्ष्यांच्या पिंजर्यांसबाहेर प्रेक्षकांसाठीही चुकीची भाषा, वाईट भाषा वापरू नये अशा सूचनाही लावण्यात आल्या आहेत. या मैनेने साध्य केलेली अश्लील भाषा विसरावी आणि पूर्वीप्रमाणेच तिने सभ्य भाषेत प्रेक्षकांचे स्वागत करावे यासाठी तिला चांगल्या टेप ऐकविल्या जात आहेत. तिने एकावे म्हणून बरेचवेळा तिला चाराही दिला जात नाही.

झूचे केअरटेकर ली यून यांचे म्हणणे असे आहे की पक्षी असली भाषा प्रेक्षकांकडूनच शिकतात. त्यातून या मैनेची स्मरणशक्ती फारच चांगली आहे. पक्षी नेहमीच उत्तम मिमिक करतात आणि बोलणारे पक्षी कोणतीही भाषा खूपच जलद आत्मसात करतात. आता या मैनाबाई पुढे काय काय प्रगती करतात हे पाहायचे.

Leave a Comment