सनीच्या मागे पोलिस स्टेशनचे चक्कर?

पॉर्न स्टारपासून बॉलिवुडची ऐक्ट्रेस झालेली सनी लियोन मंगळवारी मुंबईच्या वर्सोवा पुलिस स्टेशन मध्ये हजर झाली होती. गेल्या काही दिवसपासून नेहमीच सनीला पोलिस स्टेशनला चक्कर मारावी लागत आहे. त्यामुळे ती काहीसी चिंतीत झाली आहे.

काही दिवसापूर्वी ट्विटरवर अभिनेत्री सनी लियोनच्या अकाउंटवरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये ‘रेप क्राइम नाही ते फक्त सरप्राइज़ सेक्स आहे’ असे स्टेटमेंट ट्विटरवर झळकले होते. या टिपणीवरून मोठा वाद रंगला होता. त्यानंतर लगेचच सनीने ही पोस्ट डिलीट केली होती. त्यानंतर तिने ही पोस्ट केल्याचा आरोप ऐक्टर कमाल आर खान याच्यावर केला होता.

सनीने ४ फेबुवारी हा खुलासा ट्विटरवरून केला होता. त्यानतर सनीने मुंबई पोलिसच्या सायबर क्राइममध्ये इंवेस्टिगेशन सेलशी संपर्क साधून कमाल खानच्या विरुद्ध एक तक्रार अर्ज केला होता. वर्सोवा पोलिसने खानच्या विरुद्ध एफआईआर दाखल केला होता. तर त्यांनी पण सनीच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याबाबतची माहिती देण्यासाठी तिला दररोज पोलिस स्टेशनमध्ये हजर व्हावे लागत आहे .

Leave a Comment