हिंमत असेल तर तोगडीयांना अटक करून दाखवा: विहिंप

मुंबई: अकबरुद्दिन ओवेसी याच्या विरोधात वक्तव्य करून प्रवीण तोगडीया यांनी कोणतीही चूक केलेली नाही. हिंमत असल तर तोगडीयांना अटक करून दाखवा. त्याचे देशभर तीव्र प्रतिसाद उमटल्यखेरॆज राहणार नाहीत; असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र प्रमुख व्यंकटेश आबदेव यांनी दिला.

प्रक्षोभक भक्षण केल्याबद्दल विहिंप नेते प्रवीण तोगडीया यांच्यावर नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी भोकर येथील भाषणात मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनचे आमदार ओवेसी आणि विशिष्ट समुदायाबाबत द्वेषपूर्ण आणि प्रक्षोभक उद्गार काढल्याचा आरोप आहे.

दरम्यान; आपण हिंदुत्वासाठी तुरुंगवासच काय; कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहोत; असे तोगडीया यांनी पत्रकारांना सांगितले. देशाच्या हिताचा विचार करणे आणि तो जाहीररित्या व्यक्त करणे; हा गुन्हा होऊ शकत नाही; असेही ते म्हणाले.

Leave a Comment