नवी दिल्ली: महागाईने होरपळलेल्या जनतेला काहीसा दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात आयकर मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार २लाखांऐवजी अडीच लाख रुपयांच्या वरील उत्पन्न करपात्र होण्याची शक्यता आहे.

यशवंत सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीने आयकर मर्यादा वाढवून ३ लाख रुपये करण्याची सूचना सरकारला केली आहे. मात्र सध्या असलेली २ लाखाची मर्यादा एकदम १ लाखाने वाढविली जाणे कठीण असले तरीही किमान ५० हजार रुपयांनी ती वाढविली जाईल; अशी अटकळ आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
सध्याच्या मंदीच्या काळात वाढत्या महागाईचे संकट उभे थकल्यामुळे नागरिकांची क्रयशक्ती क्षीण झाली आहे. त्यामुळे बाजारातील वस्तूंना उठाव नसल्यामुळे मंदीत भर पडत आहे. या परिस्थितीत बाजारपेठेतील पैसा खेळता ठेवण्यासाठी सरकार निश्चितपणे आयकर मर्यादा वाढवेल; असा तज्ज्ञांना विश्वास आहे.