महिला सुरक्षिततेसाठी रवीशंकर यांचा पुढाकार

नवी दिल्ली: महिला सुरक्षेसाठी आता आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकर यांनी पुढाकार घेतला आहे. आपली संस्था देशभरातील संकटात असणार्‍या महिलांसाठी हेल्पाइन्स सुरू करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

घरगुती हिंसाचाराचा सामना करणार्‍या स्त्री व पुरुष अशा दोघांनाही तसेच मद्याच्या व्यसनाने कुणी गुन्हा करण्यास प्रवृत्त होऊ नये म्हणून आपण या हेल्पलाइन्स सरू करणार असल्याचे ते म्हणाले. या हेल्पलाइन्सअंतर्गत समुपदेशन, वैद्यकीय सुविधा आणि कायेदशीर साहाय्य आदी मदत केली जाणार आहे.

अधिक चांगल्या भारतासाठी स्वयंसेवकफ या कार्यक्रमाच्या उद्घाटनात त्यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment