पाच वर्षांत अन्नधान्य दुपटीचे ध्येय साधणे शक्यः स्वराज

नवी दिल्ली: एरवी केंद्र सरकारवर धडाडणार्‍या भाजपच्या मुलूखमैदान तोफ सुषमा स्वराज यांनी केंद्राने समोर ठेवलेल्या पाच वर्षांत अन्नधान्य दुप्पट योजनेवर विश्‍वास दर्शविला आहे. शेतीसाठी अधिक जमिनीची उपलब्धतता, सिंचनाच्या सोयी आदींच्या माध्यमातून हे ध्येय साध्य होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, अन्न सुरक्षिततेबाबत आयातीवर अवलंबून राहता कामा नये. त्यामुळे पाच वर्षांमध्ये अन्नधान्य दुप्पट करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. तथापि, हे साध्य करण्याजोगे लक्ष्य असून आपण ते साध्य करू, असा विश्‍वास त्यांनी या विषयावरील आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.

अधिक जमीन शेतीखाली आणणे, सिंचनाच्या सोयी पुरविणे आणि जमिनीची सुपीकता वाढविणे या तीन मुद्यांवरही त्यांनी भर दिला. नव्याने येत असलेली विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) महत्त्वाची असली तरी वर्षाला तीन पिके देणार्‍या सुपीक जमिनीचा त्यासाठी बळी जात कामा नये, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Leave a Comment