चित्रांगदा सिंह होणार शुटर

तसे पहिले तर अनेक खेळाडू पुढे चालून बॉलिवुडमध्ये करियर करण्याचा विचार नेहमीच करीत असतात. मात्र अभिनेत्री असलेल्या चित्रांगदा सिंहच्या बाबतीत थोडेसे उलट झाले आहे. गेल्या काही दिवसापासून बॉलिवुड ऐक्ट्रेस चित्रांगदा सिंह आता नैशनल लेवलची स्पोर्ट पर्सन बनायची तयारी करीत आहे.

सध्या ती स्कीट शूटिंगची ( एकाच वेळी दोन टारगेटवर निशाना साधण्याचा) प्रैक्टिस करीत आहे. येत्या मार्च महिन्यात होत असलेल्या नैशनल लेवलच्या शूटिंग कॉम्पिटिशन मध्ये ती सहभागी होणार आहे. याबाबत बोलताना चित्रांगदा म्हणाली, ‘ सिनेमात काम करणे ही एक फैशन आहे, मात्र मला सुरुवातीपासुनच खेळामध्ये खास इंटरेस्ट आहे. मी ज्या फैमिलीशी जोडली गेली आहे, त्याला आर्मीचे बैकग्राउंड आहे. मला लहानपनापासून शूटिंगमध्ये इंटरेस्ट निर्माण झाले. त्यामुळेच मी कमी सिनेमे साइन केले आहेत. त्यामुळे आगामी काळात मी जादा बीजी असणार नाही. कमी काम असल्याने मी शूटिंगच्या प्रैक्टिससाठी जास्त वेळ काढता येत आहे.’

गेल्या काही दिवसापासून ती भावासोबत गनची प्रैक्टिस करीत आहे. तो एक नैशनल लेवलवरचा शूटर आहे. चित्रांगदाला त्याच्या कडून खूप काही शिकता आले आहे. खेळामुळे मी सदैव रिफ्रेश राहते. त्याशिवाय चित्रांगदाचा पती ज्योति रंधावा हा सुद्धा गोल्फर आहे. पती ज्योति रंधावामुळेच मला खेळण्याची प्रेरणा मिळाली असल्याचे चित्रांगदाने सांगितले.