रिलायन्स पुन्हा अव्वल स्थानावर

मुंबई दि.२ – देशातील सर्वात महत्त्वाची आणि मौल्यवान कंपनी बनण्याचा मान पुन्हा रिलायन्स इंडस्ट्रीने हस्तगत केला असून अगदी अल्पकाळ प्रथम स्थानावर असलेल्या ओएनजीसी कंपनीला पुन्हा मागे सारत रिलायन्सने हा मान पटकावला आहे.

जीडीपी सूचीनुसार गुरूवारीच ओएनजीसीने रिलायन्सला मागे सारून देशातील सर्वात मौल्यवान कंपनीचे टायटल मिळविले होते. मात्र शेअर बाजाराच्या शेवटच्या सत्रात रिलायन्सचे बाजारमूल्य वाढून २,८९,०७८ कोटी रूपयांवर पोहोचले व कंपनी पुन्हा अव्वल स्थानी आली. ओएनजीसीचे बाजारमूल्य शेवटच्या सत्रात २,८४,४२७ कोटींवर होते. शुक्रवारच्या शेवटच्या सत्रात रिलायन्सचा शेअरही ०.७८ ने वाढून ८९३.४५ वर बंद झाला तर ओएनजीसीचा शेअर २.१२ ने घसरून ३३८.४५वर बंद झाला असे समजते.

Leave a Comment