रणबीर, कैटरीना पुन्हा एकत्र

अजब प्रेम की गजब कहानी, या बहुचर्चित सिनेमात रणबीर कपूर आणि कैटरीना कैफ सोबत दिसले होते. सिनेमाच्या शूटिंगच्यावेळी दोघांच्या प्रेम काह्ननीचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. हा सिनेमा रिलीज झाला आणि त्याची चर्चा पण संपली. काही दिवसपासून पुन्हा या दोघांची प्रेम कहाणी फुलली आहे. दोघांच्या या प्रेमाची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.

गेल्या काही दिवसपासून रणबीर आणि कैटरीना पुन्हा सोबत दिसत आहेत. दोघेजन चांगले दोस्त आहेत याची कल्पना सर्वाना आहे. त्यामुळेच दोघेजण एकत्र फिरतात व डिनर देखील करताना दिसले आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या न्यू ईयरवेळी दोघेजन एकत्रित दिसल्याने पुन्हा एकदा अफवा पसरल्या आहेत.

कैटरीना मुंबई वरून लंडनला पोहचली. त्याठिकाणी न्यूयॉर्कला पोहचल्यानंतर रणबीर कपूर पण त्याठिकाणी पोहचला. त्याठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत केले. गेल्या काही दिवसपासून झालेल्या अवॉर्ड कार्यक्रमात दोघेपण एकत्रित दिसले. दोघाचे पण ब्रेकअप झाल्यानंतर एकमेकाची सोबत त्यांना चांगली वाटत आहे. कैटरीनाचे सलमान सोबतचे तर रणबीरचे दीपिका सोबत ब्रेकअप झाल्याने दोघेपण सध्या साथीदार हुडकत आहेत.

तसे पहिले तर अभिनेता रणबीर कपूर आणी अभिनेत्री कैटरीना दोघेपण एकमेकांना खुप पसंत करतात. दोघेजण जरी एकमेकाना पसंत करीत असले तरी त्यांच्यातील रिलेशन काही पुढे वाढले नाहीत. दोघेपण त्यांच्यातील संबध नेक्स्ट लेवलवर जाण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दीपिकाच्या बाबतीत रणबीरने गडबड केली होती. त्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.

Leave a Comment