वेळेचा सदुपयोग म्हणजेच यश – ऋतिक रोशन

तसे पहिले तर काहीजनाच्या मते यश म्हणजे, केवळ नाव आणि प्रसिद्धि कमविणे एवढेच आहे. मात्र अभिनेता ऋतिक रोशनच्या मते वेळेचा योग्य वापर करणे म्हणजेच यश आहे. तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात नविन कामाने अथवा तुमच्या पसंतीच्या कामाने करू शकतो.

दोनच दिवसापूर्वी डिजाइनर घडयाळ असलेल्या ब्रांड राडोचे लॉन्च अभिनेता ऋतिक रोशनच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अभिनेता ऋतिक रोशन म्हणाला, ‘ माझ्याकडे खूप असा अनुभव असल्याने मी यशाकडे वेगळ्या अंदाजाने पाहत असतो. यश म्हणजे केवळ प्रसिद्धी आणी श्रीमंती नाही. यश म्हणजे तुम्ही वेळेचा वापर कशाप्रकारे करत असता यावर अवलबुन आहे.’

कामासाठी आपण जर काही वेळ राखून ठेवत असू व निर्धारित केलेले काम जर वेळेत पूर्ण करता आले तर तुम्ही जीवनात ख-या अर्थाने यशस्वी होवु शकता. वेळेचे महत्व जाणून घेण्यासाठी तू कोणाचा आदर्श डोळ्यामोर ठेवतो या बाबत विचारले असता त्याने वेळेचे महत्व जाणून घेण्यासाठी मी वडील राकेश रोशनचा आदर्श डोळ्यामोर ठेवून चालत असल्याचे ऋतिकने यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Leave a Comment