पुणे दि.३१ – पुणे अन्न आणि औषध प्रशासनाने ११ पथके तैनात केली असून बस आणि रेल्वेमधून राज्यात आणण्यात येत असलेल्या प्रवासी तसेच पार्सलांमधून बंदी असलेला गुटखा राज्यात येत नाही ना याची तपासणी ही पथके दक्षतापूर्वक करणार आहेत असे सांगण्यात आले आहे.

राज्यात गुटखा बंदी लागू झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर हे बंदी असलेले पदार्थ राज्यात आणले जात आहेत. त्याला प्रतिबंध करण्यासाठी अनेक उपाययोजनाही सातत्याने आखल्या जात आहेत. महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असली तरी शेजारच्या कर्नाटकात गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी नाही. त्यामुळे या राज्यातून येणार्या सार्वजनिक वाहतूक शाखेच्या बस गाड्या तसेच खासगी प्रवासी गाड्यांतून येणार्याळ पार्सलांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे. संशय येणार्याड प्रवाशांच्या सामानाचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच नुसती पार्सलेच पाठविली गेली असली आणि त्यात कांही संशयास्पद असेल असा संशय असला तर ती पार्सलेही तपासली जाणार आहेत.
कर्नाटकातून येणार्या प्रवासी वाहनांवर जादा लक्ष देण्यात येणार असले तरी अन्य राज्यांतून येणारी वाहनेही या पथकांच्या नजरेतून सुटणार नाहीत असे अधिकार्यांलचे म्हणणे आहे. बस प्रमाणेच रेल्वे पार्सलांवरही नजर ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनाने पुण्यात तीन व्यावसायिकांकडून अलिकडेच सुमारे १० लाख रूपयांचा गुटखा जप्त केला असून त्या तिघांवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.