मल्लिकाला धमकावले

आगामी काळात भंवरी देवीवर आधारित सिनेमा येत आहे. ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमात अभिनेत्री मल्लिका शेरावत प्रमुख भूमिका करीत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून तिला धमकी दिली जात आहे. त्यामुळे अभिनेत्री मल्लिका मात्र घाबरून गेली आहे.

मल्लिकाला काही दिवसापूर्वीच तिला धमकीचा फोन आला होता. हा फोन तिच्या भावाने घेतला. फोन करणार्‍याने मल्लिकाला या सिनेमापासून दूर रहाण्यास सांग; अशा शब्दात धमकी दिली. अभिनेत्री मल्लिका मात्र घाबरली असून ती या धमकीचा गांभीर्याने विचार करीत आहे.

यापूर्वी अभिनेत्री मल्लिकाशिवाय या सिनेमाचा दिग्दर्शक के सी बोकाड़ियाला सुद्धा कोणीतरी धमकी दिली आहे. त्यांना भंवरी देवीवर आधारित सिनेमा तयार करू नये असे धमकावले आहे. मात्र बोकाड़िया सिनेनिर्मितीच्या निर्णयावर ठाम आहेत. बोकाडिया म्हणाले की , आगामी काळात येत असलेल्या सिनेमाचे चित्रिकरण सुरु असून हा एक चांगला सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाच्या कामात व्ययत्य आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

जोधपूर येथील भंवरी देवी काही दिवसापूर्वी बिलारा येथून बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. या सर्व घटनाक्रमावर आधारित बोकाड़िया हा सिनेमा तयार करीत आहे.

Leave a Comment