कार्बनचा टायटेनियम-१ मोबाईल बाजारपेठेत

नवी दिल्ली: कार्बन मोबाईल कंपनीने देशातील कार्बन टायटेनियम-१ हा पहिला क्वाडफोर्ड स्मार्टफोन बाजारपेठेत आणला आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत ११ हजार रुपये आहे.

कार्बन टायटेनियम-१ या फोनमध्ये क्वाडफोर्ड स्नेपड्रेगन प्रोसेसर असून ४.५ आयपीएस क्यू एसडी डिस्प्ले आहे. वेब ब्राउजिंग, गेमिंग, युजर इण्टरफेस अशा सर्व दृष्टीनी अत्याधुनिक असा हा फोन आहे.

इनबिल्ट एडरेनो २०३ जीपीयू, एच डी रिझोल्यूशन डिस्प्ले आणि इतर काही ग्राफिक एप्लिकेशन्स यामुळे हा फोन भारतातील सर्वात अत्याधुनिक फोन असेल; असा दावा कार्बन मोबाईलचे कार्यकारी संचालक संचालक शशीन देवसरे यांनी केला.

Leave a Comment