सनी झाली आता बॉलीवूड अभिनेत्री

पोर्न स्टार सनी लियोन गेल्या काही दिवसापासून बॉलीवुडच्या ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. हा तिचा बॉलीवुड मधील दुसरा सिनेमा आहे. यापूर्वी तिने ‘जिस्म-२’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. गेल्या काही दिवसापासून ती चांगलीच चर्चेत आहे. ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमामध्ये ती बॉलीवूड अभिनेत्रीचा रोल करीत आहे.

सनीचा जन्म कनाडा मध्ये झाला असली तरी तिचे माता -पिता भारतीय वंशाचे आहेत. सनीने ‘बिग बॉस-५’ मधून तिने भारतात एन्ट्री केली होती. भारतातील या शो मधून तिने बिजनैसची सुरुवात केली होती. त्यानतर तिने पूजा भट्टच्या ‘जिस्म-२’ या सिनेमातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यातील तिची भूमिका पाहून दिग्दर्शक एकता कपूरने तिला ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमासाठी साइन केले होते.

‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमात सनी बॉलीवुडमधील अभिनेत्रीचा रोल करीत साल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सिनेमाची शुटींग गेल्या आठ दिवसापासून सुरु झाली आहे. ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमाचे दिग्दर्शक म्हणून भूषण पटेल तर निर्माता म्हणून एकता कपूर काम पाहत आहे. यापुवी २०११ साली आलेल्या “रागिनी एमएमएस” या सिनेमाचा पुढचा भाग आहे. या सिनेमाची कथा दिल्लीतील एका लहान मुलीच्या जीवनावर आधारित आहे. त्या मुलीचा एमएमएस सगळीकडे पसरतो असे या सिनेमात दाखविण्यात आले आहे. या सिनेमाची शूट सध्या फिल्म सिटीत सुरु आहे.

Leave a Comment