विवाहित मैत्रिणीला नग्न फोटो पाठविणारा टीव्ही कलाकार जेरबंद

मुंबई: विवाहित मैत्रिणीला स्वत:ची नग्न छायाचित्र पाठविल्याबद्दल दूरचित्रवाणी कलाकाराला मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर भारतीय दंड विधान आणि सायबर कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

सनील सोधी असे या कलाकाराचे नाव आहे. त्याने त्याच्या विवाहित मैत्रिणीला स्वत:ची २६ नग्न छायाचित्र पाठविली. त्याचप्रमाणे मोबाईल मेसेंजरद्वारे अश्लील मजकूरही पाठविला. या महिलेने केलेल्या तक्रारीवरून रविवारी रात्री पोलिसांनी सनील याला जेरबंद केले.

सनील याने रिश्ते, हम अशा मालिकांमध्ये आणि हु तू तू, हजार चौरासी की मां अशा चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.