मिंकवर नाराज जगदीश माळी

बॉलीवूडमधील मॉडेल मिंक बरा हिने १९७० च्या दशकातील बेस्ट फोटोग्राफर जगदीश माळीला बेवारस स्थितीत मुंबईमधील रस्त्यावर फिरताना पहिले होते. मात्र याच घटनेमुळे मिंकवर जगदीश नाराज आहे. जगदीशच्या मते , ‘ गेल्या ११ वर्षापासून तो शुगरचा पेशंट आहे. त्याशिवाय त्याला कुठलाही मेंटल अथवा फिजिकल प्रॉब्लम नाही. तरी पण त्याची मिडियावाल्यांनी बदनामी केली आहे.’

गेल्या काही दिवसापासून माळी हे अंधेरीत राहतात. याबबत बोलताना जगदीश माळी म्हणाले, ‘ सकाळी उठल्यानंतर कैजुअल ड्रेस मध्ये वर्सोवापर्यंत फिरायला जातो. डॉक्टरने मला दूरपर्यंत चालण्यास सांगितले आहे. चालत असताना माझा शुगर लेवल डाउन झाल्याचे जाणवले. त्यामुळे मी एका दोस्ताच्या दुकाना समोर बसलो होतो. त्याठिकाणी मी त्याच्याकडून खाण्यासाठी चॉकलेट घेतले. शुगर कंट्रोल करण्यासाठी मला ही आयडिया सुचली होती. मात्र ज्यावेळेस मी जागी झालो. त्यावेळी पहिले तर माझ्या तोंडाला चॉकलेट लागली होती. मीडियाचे कैमरे मला कैद करीत होते. मी काही बोलण्यापूर्वीच मिडीयाने माझी खूप बदनामी केली.’

जगदीश माळी १९८०-९० या काळात खूप मोठे फोटोग्राफर होते. बॉलिवुडच्या काही ऐक्टर आणि ऐक्ट्रेसने फोटो काढून पब्लिसिटी दिली होती. विशेष म्हणजे रेखाला ऐक्ट्रेस म्हणून उभा करण्यात जगदीश यांचे योगदान महत्वाचे आहे.

Leave a Comment