विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणारा उपप्राचार्य जेरबंद

पुणे: शाळेतील विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या उपप्राचार्यांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

शहरातील डॉन बॉस्को या नामांकित कोन्व्हेण्ट स्कूलमध्ये इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थिनीने आपले ६१ वर्षीय उपप्राचार्यांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचे पालकांना सांगितले. पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित शिक्षकांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजार केले. न्यायालयाने त्यांची दि. २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

एक शिस्तबद्ध आणि दर्जेदार शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शाळेत आपल्या पाल्यांना प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची रांगा लागते. मात्र या घटनेने पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे.

Leave a Comment