व्हिक्टोरिया राणीच्या प्रिटींग मिस्टेक स्टॅम्पचा लिलाव

लंडन दि. २२ – भारतात १५९ वर्षांपूर्वी चार आणे किमतीचा व्हिक्टोरिया राणीची छबी असलेले जे तिकीट छापले गेले होते त्याची विक्री लंडनच्या स्पिंक ऑफ लंडन लिलाव कंपनीकडून दि.२३ जानेवारीला केली जाणार आहे. त्या काळच्या चार आणे किमतीच्या या तिकीटाला तब्बल ७० हजार पौंडाची किमत मिळेल असा आशावाद या कंपनीने व्यत्क्त केला आहे.

हे तिकीट जुने आहे इतकेच त्याचे महत्त्व नाही. तर हे एक विशेष तिकीट आहे कारण त्यावेळी प्रिटींग करताना झालेल्या नजरचुकीतून या तिकीटावर राणीचे डोके उलटे छापले गेले आहे. विशेष म्हणजे ही चूक बराचकाळ लक्षातही आली नव्हती. १८५४ साली कलकत्त्याच्या सर्वेक्षण ऑफिसात ही छपाई झाली होती. अशी डझनावारी तिकीटे छापली आणि विकलीही गेली मात्र त्यातील आता जगभरात मिळून केवळ २० ते ३० तिकीटेच शिल्लक आहेत. त्यातील एका तिकीटाचा लिलाव होत आहे. अमेरिकन फिलॅटेलिस्ट रॉबर्ट कनलिफ यांच्या मालकीचे हे तिकीट नंतर एका खासगी कलेक्टरने विकत घेतले होते.

लिलाव करणार्याे संस्थेच्या मते हे तिकीट फारच दुर्मिळ असून तिकीट छापताना झालेली चूक लक्षात न येण्यामागे ही तिकीटे छापून सरळ विक्रीसाठीच पाठविण्यात आली होती आणि लोकांनी ती खरेदी करून वापरलीही होती. त्यावेळचे चार आणे किमतींचे हे तिकीट जगातील या किमतीचे पहिले बहुरंगी तिकीट होते. व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे १९०१ सालापर्यंत भारतात तिची छबी असलेली तिकीटे छापली जात होती असेही समजते.

Leave a Comment