विद्याची नजर ‘कहानी-२’वर

आयडिया फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणा-या अभिनेत्री विद्या बालनची नजर आता कहानीच्या आगामी काळात येत असलेल्या सीक्वल म्हणजेच ‘कहानी-२’ कडे लागली आहे.निर्माता सुजॉय गेल्या काही दिवसापासून ‘कहानी’च्या सीक्वलवर काम करीत आहे. या सिनेमात पुन्हा विद्या झळकणार आहे. पुरस्कार मिळाल्याने विद्या सध्या खूपच उत्साहित झाली आहे.

याबाबत बोलताना विद्या म्हणाली की; कहानीची यात्रा माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. ज्यावेळी या सिनेमाची सुरुवात करण्याचे ठरविले होते; त्यावेळी माझ्यासोबत केवळ दोन व्यक्ती होत्या. त्यामध्ये एक मी तर दुसरा सुजॉय असे दोनच जण या सिनेमाशी निगडीत होतो. त्यानंतर अजून काही जण या सिनेमाशी जोडल्या गेल्या. त्याकाळी एक चांगला सिनेमा तयार करण्याचा निश्चय केला होता. हा सिनेमा दर्शकांच्या पसंतीला उतरला. त्यामुळेच आम्हाला काही पुरस्कार मिळवता आले. आतापर्यंत कित्येक पुरस्कार या सिनेमामुळे मिळाले; असेही तिने कृतज्ञतेने नमूद केले.

दोन दिवसापूर्वी झालेल्या ५८ व्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डमध्ये ‘कहानी’ या सिनेमातील अभिनयासाठी विद्या बालनला बेस्ट एक्ट्रेस आणि सुजॉयला बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला आहे.

Leave a Comment