सिने उद्योगाने पहिल्यांदा प्रस्तुत करण्याची त्याची परंपरा कायम ठेवली आहे. झीटीवीने यावर्षी न्यू फेयर एण्ड लवली प्रेजेण्टस झी सिने अवॉर्ड्समध्ये आता नव्याने एक केटगरी प्रस्तुत केली आहे. फेसबुक, ट्विटर व यू टयूब सारख्या सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता आणि आज कालच्या युवाकाचा त्यावर होणारा प्रभाव पाहून झी सिने अवॉर्ड्सने त्याच्या सन्मानासाठी एक स्पेशल अवार्ड ठेवला आहे. त्यामध्ये सर्वाधिक प्रेम मिळलेला हिरो म्हणून दबंग सलमान खानची निवड करण्यात आली आहे.
रिसर्चनुसार फेसबुकवर सलमान खानच्या प्रशंसकोंची संख्या ७,४०८,८५९ एवढी आहे. तर त्या तुलनेत ट्विटरवर ३,१८८,२२६ तर यू ट्यूब वीडियोवर ६०,५६७ ट्विटर फैन क्लब्सवर ५७७,९१९ फॉलोअर आहेत. त्याशिवाय फेसबुक फैन क्लब्सवर ७५७,०५७ ओ गूगल प्लसवर २,७७४ फॉलोअर्स आहेत.
एस्टेरी एनालीटिक्सच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘ फेसबुक, ट्विटर, गूगल प्लस, यू ट्यूब ब्लॉग्स व ऑनलाइन फोरम्सचे लाखों पेज स्कैन करण्यात आली आहेत. सिनेसितारोंने दिलेल्या कनवरसेशंसनुसार त्यांच्या प्रशंसकाची संख्या पाहता आली आहे. यासाठी चार वेगवेगळ्या प्रक्रियेत ३० पेक्षा अधिकप्रत्याशियोंची यादी तयार करण्यात आली होती. या प्रक्रियेत सिंगल स्कोर सलमान खान, शाहरूख खान व अमिताभ बच्चन यांना मिळाला होता. त्यानंतर त्यामधून अंतिम नाव सलमान खानचे निवडण्यात आले. रविवारी २० जानेवरी रोजी ८ वाजता सिने अवॉर्ड्समध्ये सलमानला हा अवार्ड देण्यात आला.